यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीने पाच षटकात अवघ्या 18 धावे देत पाच विकेट घेतल्या.

विश्वचषक स्पर्धेत शमीला उशीरा संधी मिळाली. पाचव्या सामन्यात मैदानात उतरलेल्या शमीने पाच विकेट घेत आपली दखल घ्यायला भाग पाडली, त्यानंतरच्या सामन्यात चार विकेट आणि तिसऱ्या सामन्यात पुन्हा पाच विकेट घेतल्या.

मोहम्मद शमीने अवघ्या तीन सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीबरोबरच शमीने भारताकडून विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. या आधी हा विक्रम झहीर खानच्या नावावर होता.

मोहम्मद शमीने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यात 45 विकेट घेतल्या आहेत. यात शमीने तीन वेळा पाच आणि चार वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

तर याआधी झहीर खानच्या नावावर 23 सामन्यात 44 विकेटचा रेकॉर्ड होता. 2011 विश्वचषक विजयात झहीर खानचा मोलाचा वाटा होता. झहीने एक वेळ चार विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने विश्वचषक स्पर्धेच्या 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने दोनवेळा चार विकेट घेतल्या आहेत.

भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 31 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाचे कर्णधार कपिल देल यांनी 26 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केला. यात त्यांच्या नावावर 28 विकेट जमा आहेत

VIEW ALL

Read Next Story