ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल बुधवारपासून भारत विरुध्द ऑस्ट्रेलियामध्ये यांच्यामध्ये सुरु झालीये.
जर भारतीय टीमने हा सामना जिंकला तर भारत 2013 नंतर ICC ट्रॉफी जिंकेल, कारण 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
ह्या सामन्यात सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष अजिंक्य रहाणेवर असेल. कारण अजिंक्य रहाणेने तब्बल 15-16 महिन्यांनी भारतीय कसोटी संघात कमबॅक केलं आहे
अजिंक्य रहाणे 6 जून रोजी 35 वर्षाचा झाला आहे, IPLमध्ये अजिंक्य रहाणेच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळवलं आहे
अजिंक्य रहाणेने IPL मध्ये 14 सामन्यात 32.60च्या एवरेजनुसार 326 धावा केल्या आहेत
अजिंक्य रहाणेच्या नावावर अजून एक रेकॉर्ड आहे, अजिंक्य रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलं आहे तेव्हा भारतीय संघ विजयी झाला आहे
अजिंक्य रहाणेने 12 कसोटी सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामधून 9 सामने भारत जिंकला आहे आणि 3 सामने ड्रॉ झाले आहेत म्हणजे भारत पराभूत झाला नाही
अजिंक्य रहाणेच्या नावावर 3 एकदिवसीय शतक आहेत आणि ते तीनही सामने भारताने जिंकले आहेत
जर ICC वल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने शतक केलं तर भारतीय संघ नक्कीच हा सामना जिंकेल