आयपीएल 2024 साठी 19 नोव्हेंबरला लिलाव पार पडला. त्यानंतर पुन्हा एकदा एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे.

2024 हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असणार असं बोललं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच सीएकसेने उत्तर दिलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी एमएस धोनीच्या निवृत्तीवर आता मोठी माहिती दिली आहे.

एका मुलाखतीत बोलताना काशी विश्वानाथन म्हणाले एमएस धोनी आपलं भविष्य स्वत: ठरवेल. आम्ही यात काहीही हस्तक्षेप करणार नाही

एमएस धोनी आपल्या निवृत्तीबाबत संघ व्यवस्थापनाशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आणि संघ व्यवस्थापनानेही धोनीला विचारलेलं नाही असं विश्वनातन यांनी स्पष्ट केलं.

आयपीएल 2024 ऑक्शन दरम्यान चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफेन फ्लेमिगनेसुद्धा धोनीच्या भविष्यावर वक्तव्य केलं होतं.

धोनी अजूनही फिट आहे आणि तो संघासाठी भविष्यातही चांगली कामगिरी करेल असा विश्वास असल्याचं फ्लेमिंगने म्हटलंय.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईस सुपर किंग्सने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 2008 च्या पहिल्या हंगामापासून धोनी सीएसकेचा कर्णधार आहे.

VIEW ALL

Read Next Story