ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर 20 धावांनी मात केली. या हंगामातील दिल्लीचा हा पहिला विजय तर चेन्नईचा पहिला पराभव होता.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
माहिने 16 चेंडूत 37 धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट होता 231.25 चा.
पण सामन्यानंतर धोनी मैदानावर इतर खेळाडूंशी चर्चा करत होता, त्यावेळी त्याच्या डाव्या पायावर सर्वांचं लक्ष गेलं. त्यामुळे चाहत्यांचचं टेन्शन वाढलंय
धोनीने डाव्या पायाला आईसपॅक लावला होता. यामुळे धोनी दुखापतग्र असल्याचा अंदाज लावला जात आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय.
धोनीची ही जुनी दुखापत उफाळून आली आहे की फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली याबाबत अद्याप चेन्नई व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आयपीएलच्या गेल्या हंगामात डाव्या पायाच्या दुखापतीनंतर धोनीने चेन्नईला जेतेपद मिळवून दिलं होतं. आयपीएलनंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.