जिंकलेल्या Olympic मेडल इतकीच चर्चा स्वप्निल कुसळेने फायलनमध्ये घातलेल्या अंगठीची

कांस्य पदकावर कोल्हापूरकराचं नाव

पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे.

थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने ऐतिहासिक कामगिरी करत सातव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत हे ऐतिहासिक पदक जिंकलं.

शांत आणि संयमी खेळी

स्वप्निलने 451.4 पॉइण्ट्स पटकावत कांस्य पदकावर नाव कोरलं. संपूर्ण सामन्यात स्वप्निल शांत आणि संयमीपणे खेळताना दिसला.

एकाग्रता टिकून ठेवली

गुडघ्यावर बसून, झोपून आणि उभं राहून निशाणा साधताना स्वप्निलची एकाग्रता टिकून ठेवत ऐतिहासिक पदक मिळवून दिलं.

अंगठीमधूनच दिलेले संकेत

मात्र स्वप्निलच्या कामगिरीआधीच त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक आपण जिंकणार याचे संकेत आपल्या अंगठीमधूनच दिले होते.

अंगठीने लक्ष वेधून घेतलं

स्वप्निलच्या हातामधील अंगठीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

काय खास अंगठीमध्ये?

स्वप्निलने फायनल खेळताना आपल्या उजव्या हातामध्ये ऑलिम्पिकचं चिन्ह असलेलं पाच वर्तुळांची डिझाइन असलेली अंगठी घातली होती.

VIEW ALL

Read Next Story