चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने लखनऊविरुद्ध धमाकेदार शतक ठोकलं. ऋतुराजने 60 बॉलमध्ये 108 धावांची खेळी केली.
12 फोर अन् 3 सिक्सच्या मदतीने ऋतुराज गायकवाडने आयपीएल करियरमधील पहिलं शतक झळकावलं आहे.
ऋतुराजच्या या कामगिरीमुळे एक मोठा रेकॉर्ड त्याने नावावर केला. गेल्या 17 वर्षात धोनीला जे जमलं नाही ते ऋतुराजने करून दाखवलं.
होय, चेन्नई सुपर किंग्जसाठी शतक ठोकणारा पहिला कॅप्टन म्हणून ऋतुराजचं नाव कोरलं गेलंय.
गेल्या 17 वर्षात महेंद्रसिंग धोनीला एकही शतक ठोकला आलं नव्हतं. धोनीचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर 84 रन्स आहे.
ऋतुराज गायकवाड यंदाच्या आयपीएलच्या हंगामात शतक ठोकणारा सातवा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे आता ऋतुराजला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.