IND vs PAK सामन्यावर सौरव गांगुलीची खळबळजनक भविष्यवाणी!
आगामी आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना 2 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
दोन्ही संघामध्ये यंदा टफ फाईट पहायला मिळेल. एकीकडे बाबर आझम तर दुसरीकडे विराट कोहली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोण जिंकणार? असा सवाल आता सर्वत्र विचारला जात आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.
यंदाच्या आशिया कप सामन्यात कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? असा सवाल गांगुलीला विचारला गेला. त्यावर गांगुलीने रोखठोक उत्तर दिलं.
आवडता संघ निवडणं माझ्यासाठी कठीण आहे. दोन्ही संघ चांगले आहेत. पाकिस्तान हा चांगला संघ मानला जातो, असं गांगुली म्हणाला आहे.
भारत नक्कीच मोठा आणि चांगला संघ आहे. मात्र, माझं कोणताही संघ आवडता नाही, जो चांगला खेळेल तो विजेता होईल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
बुमराहने आयर्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आणि ही टीम इंडियासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कालांतराने त्याचा फिटनेस चांगला होत जाईल, असंही गांगुली म्हणतो.
दरम्यान, गांगुलीला जरी टीम इंडियावर विश्वास नसला तरी देखील भारत पाकिस्तानचं नाक ठेचावं, असं प्रत्येक क्रिडाप्रेमाला वाटत आहे.