पाकिस्तान श्रीलंकेदरम्यानच्या सामन्यात मैदानातील हाय व्होल्टेज ड्रामा सुरु असतानाच हे काय घडलं?

Sep 15,2023

पाकिस्तानला केलं पराभूत

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानचा आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 मधील सामना फारच रोमहर्षक झाला. या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केलं.

अश्रू अनावर

पाकिस्तान अगदी शेवटच्या चेंडूवर पराभूत झाल्याने अनेक पाकिस्तानी खेळाडूंना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

पाकिस्तानी खेळाडूंचे चेहरे पडले

पाकिस्तानच्या तोंडचा विजयाचा घास श्रीलंकन फलंदाजांनी हिरावल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचे चेहरे पडले.

शेवटून दुसऱ्या चेंडूवर चौकार

अंतिम षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलमध्ये 6 धावा हव्या असतानाच स्लीपमधील गॅपमधून असलंकाने चौकार लगावल्यानंतर श्रीलंकन फलंदाजांनी सेलिब्रेशन केलं.

शेवटच्या चेंडू आधीच सोडला धीर

मात्र अंतिम षटक टाकणारा आणि या सामन्यातून पदार्पण करणारा झमान खान या शेवटून दुसऱ्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर मैदानात निराश बसून होता.

बाबरलाही दु:ख लपवता आलं नाही

शेवटच्या चेंडूवर असलंकाने उत्तमरित्या चेंडू टोलावत विजयासाठी आवश्यक असलेल्या 2 धावा काढल्यानंतर तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही आपलं दु:ख लपवता आलं नाही.

एकीकडे हसू तर दुसरीकडे दु:ख

एकीकडे पाकिस्तानी खेळाडू निराश असतानाच दुसरीकडे श्रीलंकन खेळाडू विजयाचं सेलिब्रेशन करत होते.

आफ्रिदीने दिला धीर

सामन्यानंतरही झमान खान रडू लागला असता शाहीन शाह आफ्रिदीने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

आफ्रिदीही अनेकदा झाला निराश

शाहीन शाह आफ्रिदीही त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्रेट चौकार लगावण्यात आल्यानंतर निराश होऊन क्रिजवरच बसला होता.

अनेकांच्या डोळ्यात पाणी

पराभवामुळे पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक स्टार खेळाडू जखमी असल्याने पाकिस्तानी संघात अनेकांना स्थान देण्यात आलेलं.

VIEW ALL

Read Next Story