आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2024 ची सुरुवात 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होणार आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेआधी भव्य दिव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. वेस्टइंडिजच्य गयाना स्टेडिअमवर हा सोहळा पार पडणार आहे.

2 जूनला वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनीदरम्यान सामना रंगणार आहे. या सामन्याआधी म्हणजे भारतीय वेळेनुसार दोन जूनला संध्याकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा रंगेल

उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध गायक डेव्हिड रुडर, संगीतकार रवी बिसंभर आणि गीतकार इरफान अल्वेस यांचे कार्यक्रम रंगणार आहेत.

याशिवाय सिंगर आणि डिजे एना आणि अल्ट्रा सिम्मो यांचा जलवाही पाहायला मिळणार आहे. हे कलाकाल त्रिनिदादमध्ये लोकप्रिय आहेत.

तर अमेरिकेतही 2 जूनला उद्घाटन सोहळा पार पडेल. अमेरिका आणि कॅनडादरम्यानच्या सामन्याआधी ग्रँड प्रेयरी स्टेडिअमध्ये सोहळा रंगेल.

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story