टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता केवळ दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल.

टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जून पासून सुरुवात होईल. त्याआधी टीम इंडिया 1 जूनला भारत आणि बांगलादेशदरम्यान एक सराव सामना खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाचे लीगमधले सर्व सामने अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे.

टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियात नव्या जर्सीत फोटोशूट केलं आहे. विराट कोहली वगळता सर्व खेळाडू या फोटोशूटमध्ये दिसतायत.

टीम इंडियाच्या कर्णधारासह सर्व खेळाडू या फोटोशूटमध्ये जबरदस्त अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळताय.

नवी जर्सी, नवा जोश टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. 5 जूनला टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे.

त्यानंतर 9 जूनला भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची सर्व तिकिटं आधीच विकली गेली आहेत.

त्यानंतर टीम इंडिया 12 जूनला यजमान अमेरिकेबरोबर दोन हात करेल. तर 15 जूनला टीम इंडिया आणि कॅनडा आमने सामने असतील.

भारताचे सर्व सामने न्यूयॉर्कमधल्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रायी क्रिकेट स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. या स्टेडिअमची तुलना व्हाईट हाऊसशी केली जातेय.

2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी टीम इंडिया जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे.

VIEW ALL

Read Next Story