10 वर्षाचा वनवास!

हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक?

आयसीसी टॉफी

2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने 8 आयसीसी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला, परंतू गेल्या 10 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसी टॉफी जिंकता आली नाही.

2014

2014 मध्ये भारतीय संघ T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता, परंतू फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झाला.

2015

2015 मध्ये भारत एकदिवसीय विश्वचषक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.

2016

2016 मध्ये भारतीय संघ T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, पण सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं.

2017

2017 मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

2019

2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

2021 WTC

2021 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (WTC) न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

2021

2021 च्या T20 विश्वचषकात भारतीय संघ न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे बाहेर गेला होता.

2022

2022 मध्ये T20 विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सेमीफायनल गाठली होती पण इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

VIEW ALL

Read Next Story