भारताचा युवा क्रिकेट रिंकू सिंगने 12 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केला. रिंकू सिंग 26 वर्षांचा झालाय. अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

पण रिंकू सिंगचा वाढदिवस एका कारणाने खास ठरला आहे. अफगाणिस्तानची मिस्ट्री गर्ल अर्थात वाजमा अयूबीने रिंकू सिंगला खास मेसेज केला आहे.

वाजमा आयुबीने रिंकू सिंगबरोबरचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाजमाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.

Wazhma Ayoubi च्या या पोस्टवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी रिंकू सिंगला भाई काहीतरी गडबड आहे, सावध राहा असा सल्लाही दिलाय.

अफगाणी गर्ल Wazhma Ayoubi ही जबरदस्त क्रिकेट फॅन आहे. अफगाणिस्ताननंतर तिचा आवडता संघ टीम इंडिया आहे. अनेक सामन्यात ती टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसते.

वाजमा ही भारताचा क्रिकेट स्टार विराट कोहलीची खूप मठी फॅन आहे. एशिया कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नावाची जर्सी घातल्याचे तिचे फोटो व्हायरल झाले होते.

अफगाणिस्तानची नागरिक असलेली वाजमा अयुबी ही उद्योगपती आहे. ती दुबईत राहाते आणि क्रिकेट हा खेळ तिला खूप आवडतो. वाजमााचा स्वत:चा फॅशन ब्रँड आहे.

VIEW ALL

Read Next Story