टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने श्रीलंकेविरुद्ध 94 बॉलमध्ये 88 धावांची धुंवाधार खेळी केली.
आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या शतकावर होत्या. सचिनचा ऐतिहासिक 49 शतकांच्या रेकॉर्ड विराट मोडू शकला असता.
मात्र, विराट कोहली सचिनच्या 49 शतकांची बरोबरी करू शकला नाही. अवघ्या 12 धावांनी त्याचं शतक हुकलं.
विराट कोहली सचिनच्या विक्रमाची बरोबरी करू शकला नाही, तरी त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा 1000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने मोडून काढला आहे.
कॅलेंडर वर्षात सचिनने 7 वेळा 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तर विराटने आता 1000 धावा पूर्ण करून 8 वेळा ही कामगिरी केली आहे.