भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यासाठी संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट 8 रेकॉर्डस् मोडून आपल्या नावे करू शकतो.
विराट कोहली या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियातील 1,809 धावा करण्याचा रेकॉर्ड मागे टाकू शकतो. कोहलीने सध्या 13 टेस्टमध्ये 1352 धावा केल्या आहेत. आता त्याला रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ 458 धावांची गरज आहे.
विराट हा ऑस्ट्रेलियात परदेशी खेळाडूंकडून सर्वाधिक टेस्ट शतक झळकावण्याचा विक्रम सुद्धा नावावर करू शकतो. विराटने ऑस्ट्रेलियात टेस्ट खेळताना सहा शतके केली. याबाबतीत सध्या त्याच्या पुढे जॅक हॉब्स (9 शतकं) आणि वॉली हॅमंड (7 शतकं) आहेत.
ऑस्ट्रेलियातील ॲडलेड ओव्हल येथे विराटने चार टेस्टमध्ये 509 धावा केल्या आहेत. जर यावेळी त्याने येतेच आणखीन 102 धावा केल्या तर यामैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या ब्रायन लाराच्या (610 धावा) रेकॉर्डला तो मागे टाकू शकतो.
विराट कोहली हा ऑस्ट्रेलियात 4 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियात सर्व फॉरमॅटमध्ये 3,426 धावा केल्या आहेत.
ॲडलेड ओव्हलवर कोहलीने या आधीच पाच शतकं झळकावली आहेत. तेथे आणखी एक शतक झळकावल्याने तो मैदानावर 1,000 धावा करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरेल. एवढेच नाही तर MCG मधील पाच शतकांचा जॅक हॉब्सचा विक्रमही मागे टाकेल.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा टेस्ट सामना हा विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा विराट हा सचिननंतर (110) दुसरा खेळाडू असेल.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत 16 शतक ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकली. तेव्हा विराट सचिनच्या या विक्रमाच पाठलाग करेल.