विराटचं हे रेस्तराँ तुम्हालाही परवडेल...

विराटच्या या रेस्तराँमध्ये बहुविध पदार्थांची गर्दी आहे. यामध्ये खुद्द विराटच्या आवडत्या पदार्थांचाही समावेश आहे. सुपरफूड सॅलडपासून पर्ल बार्ली रिसोतोपर्यंतचे पदार्थ इथं मिळतात. त्याचे दर 725 रुपयांच्या घरात आहेत.

सॅलड

One8 Commune मध्ये अॅवाकाडो, बुराटा, ग्रेप, बार्ली अशा विविध प्रकारचे सॅलडही मिळतात. 475 किमान ते 900 कमाल अशा दरांमध्ये इथं तुम्हाला विविध प्रत्येक कोर्सचे पदार्थ खाण्याची संधी मिळते.

ओपन सँडविच

475 ते 575 रुपयांच्या दरात या रेस्तराँमध्ये तुम्हाला करिड बीटरुट अँड अॅवाकाडो टोस्ट, मश्रूम टोस्ट, सनड्राईड टोमॅटो-पेस्टे- एग टोस्ट असे ओपन सँडविच तुम्ही घेऊ शकता.

स्मोक्ड एगप्लांट मूस

मुंबईत असणाऱ्या या रेस्तराँमध्ये टर्किश एग्स, एग्स फ्लॉरंटीन, पॅन केक, ट्रफल हनी मस्कार्पोन, एडामामे मूस, स्मोक्ड एगप्लांट मूस असेही पदार्थ मिळतात. 475 ते 725 अशा दरांमध्ये तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.

दाल खिचडीसुद्धा मिळते

कॉटेज चीझ फ्राय, कॉर्न रिब्स, ग्रीक चिकन, बफेलो विंग्स, हंटर्स टाको, अचारी चिकन, लॅम्ब शँक असे कमालीचे पदार्थ आणि अगदी दाल खिचडीसुद्धा मिळते.

गोडाचे पदार्थ

गोडाच्या पदार्थांविषयी सांगावं तर, बर्न्ट चीजकेकपासून क्रेमब्रुले, किस मी आयएम फ्रुटी अशा एकाहून एक सरस नावांचे कमाल दिसणारे आणि चवीष्ट गोड पदार्थ विराटच्या या रेस्तराँमध्ये 675 रुपयांना उपलब्ध आहेत.

वाईन, रम...

विविध प्रकारच्या रेड आणि व्हाईट वाईन, जिन, विस्की, स्कॉच, वोडका यांसोबतच इनहाऊस कोनकॉक्शन्सही इथं तुम्ही चाखू शकता.

one 8 Commune

एखादा खास दिवस, खास प्रसंग असेल तेव्हा one 8 Commune मध्ये येऊन या फाईन डाईनचा अनुभव तुम्ही कधी घेताय?

VIEW ALL

Read Next Story