सूर्यकुमारच्या कमेंटने जिंकली मनं

सूर्यकुमार यादवने या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने अनिल कुंबळे म्हणजे आकाश, सचिन तेंडुलकरला सिड आणि युवराजला समीरचं नाव दिलं. सूर्याची ही कमेंट लोकांच्या पसंतीस पडली आहे.

शेअर केले फोटो

अनिल कुंबळेने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरुन फोटो शेअर करत आपल्या स्टोरीवर लावला आहे. तर युवराजने केस कापतानाचा फोटो शेअर केला आहे.

कोणाला कोणतं नाव द्याल

या चित्रपटात अमिर खानचं नाव आकाश, सैफचं नाव समीर आणि अक्षयचं नाव सिड दाखवण्यात आलं आहे. सचिनने याच तीन नावांमध्ये कोण फिट होतं ते ओळखण्यास सांगितलं आहे.

दिल चाहता है

दिल चाहता है हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट होता. तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारीत असलेल्या या चित्रपटात अमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्नाने तीन मित्रांची भूमिका साकारली होती.

सचिनने शेअर केला फोटो

सचिनने हा फोटो शेअर करत एक कॅप्शनही दिला आहे. त्यात त्याने म्हटलं आहे, गोव्यात आमचा दिल चाहता है मोमेंट. आमच्या तिघांमधला आकाश, समीर आणि सिड कोन आहे, असा प्रश्नही त्याने विचारला आहे.

सचिन, अनिल, युवराज गोव्यात

सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनिल कुंबळे, युवराजबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यात अनिल कुंबळे आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे.

दिग्गज क्रिकेटपटू्ंचं बॉण्डिंग

मैदानाबाहेरही या खेळाडूंच नातं आजही एका कुटुंबासारखं आहे. भारतीय क्रिकेटचे तीन दिग्गज सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि युवराज सिंग सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करतात.

भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ

भारतीय क्रिकेटचा तो सुवर्णकाळ मानला जात होता. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, युवराज सिंग असे दिग्गज खेळाडू भारतीय टीममध्ये होते. आजही या खेळाडूंचं बॉण्डिंग कायम आहे.

वर्ल्ड कप विजयाने क्रिकेटर्स घडवले

कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 चा वर्ल्ड कप जिंकला आणि या विजयाने त्या काळात जन्मलेल्या पिढीला मोठी प्रेरणा मिळाली. यातूनच क्रिकेटपटू घडण्याची प्रक्रिया सुरु झाली. यानंतर भारतीय क्रकिेटमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू उदयास आले.

VIEW ALL

Read Next Story