सकाळच्या नाश्त्यात पांढऱ्या ब्रेडचे सेवन अनेकजण करतात. पण त्यात कार्बोहायड्रेट भरपूर असते. म्हणून त्यांचे सेवन मधुमेहामध्ये खूप हानिकारक असू शकते. जर तुम्हालाही नाश्त्यात व्हाईट ब्रेड खाण्याची सवय असेल तर ती लगेच बदला.
काहीजण एकटच राहणे पसंत करतात. परंतु दीर्घकाळ एकटेपणामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. जे लोक एकटे राहतात. आणि लोकांसोबत जास्त मिसळत नाहीत त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीराची हालचाल आणि व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. ऑफिस मध्ये सलग 8 तास बसून काम केलं जाते मात्र ही सवय आरोग्याला घातक आहे. शारीरिक हालचाली न केल्याने अनेक लोकांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढला आहे.
कितीही धावपळीत असलो तरी आपल्या खाण्यापिण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुमच्या खाण्यापिण्याबरोबरच त्याच्या वेळेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
गेल्या 10 वर्षात भारतात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढते वय, चुकीची जीवनशैली किंवा अनुवंशिकमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. रोजच्या जीवनातील अनेक छोट्या छोट्या सवयी सुद्धा रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत असतात. चला आज आपण जाणून घेऊया याबाबत सविस्तर ….