रोहित शर्माला कोणता पदार्थ आवडतो? स्वत:च केला खुलासा, म्हणतो...

Published by: Zee Team | Sep 23, 2023

रोहित शर्मा

आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

आवडता पदार्थ

वर्ल्ड कपपूर्वी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्माने त्याच्या आवडी-निवडीबद्दलही सांगितलं. रोहित शर्माला जेवताना कोणता पदार्थ आवडतो? यावर त्याने खुलासा केलाय.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

डाळ आणि भात

मला जेवणात डाळ आणि भात आवडतो, असा खुलासा रोहित शर्माने केला. जेव्हा तो परदेशात क्रिकेट खेळतो तेव्हा त्याला डाळ आणि भात खायला आवडतो, असं तो म्हणतो.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

रसम आणि भात

याशिवाय रोहितला रसम आणि भातही खूप आवडतो. जेव्हा आम्ही परदेशात क्रिकेट खेळतो तेव्हा अनेक कुटुंबे आम्हाला घरी जेवतात किंवा जेवण पाठवतात, असंही रोहित म्हणतो.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

परदेश

परदेशात शाकाहारी लोकांना कमी पर्याय मिळतात, पण डाळ आणि भात सगळीकडेच मिळतो, त्यामुळे सगळ्यांनाच डाळी-भात खायला आवडतं, असंही रोहित म्हणाला आहे.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

लग्नानंतर...

लग्नापूर्वी मी एकटाच राहायचो, पण लग्नानंतर जेव्हा मी कुटुंब बनवलं तेव्हा मी स्वभावाने अधिक शांत झालो, असं रोहित शर्मा सांगतो.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

मुलीच्या जन्मानंतर...

दरम्यान, माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी अधिक शांत आणि समजूतदार झालो आणि जबाबदाऱ्या समजू लागलो, असं रोहित शर्मा म्हणतो.

Published by: Zee Team | Sep 23, 2023

VIEW ALL

Read Next Story