फुटबॉलनंतर क्रिकेट हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट खेळामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या वलयामुळे अनेक दिग्गज क्रिकेटर्सकडे करोडोंची संपत्ती आहे.
भारतातील सुद्धा अनेक क्रिकेटर्सनी आपल्या पर्फोरन्समुळे जगभरात स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले. तेव्हा आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात.
गॉड ऑफ क्रिकेट अशी ओळख असणारा सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. सचिनने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती परंतु आजही त्याची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. सचिनची एकूण संपत्ती 170 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1500 कोटी इतकी आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत क्रिकेटर आहे. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली मात्र आजही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीची एकूण संपत्ती 111 मिलियन डॉलर म्हणजे 1000 कोटी रुपये आहे.
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत खेळाडू आहे. विराट कोहलीची एकूण संपत्ती ही 92 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 800 कोटी आहे.
ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला रिकी पॉन्टिंग हा श्रीमंतीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2003 आणि 2007 मध्ये पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड कप जिंकला होता. पॉन्टिंगची नेटवर्थ 70 मिलियन डॉलर म्हणजेच 600 कोटी रुपये इतका आहे.
ब्रायन लारा हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. याची संपत्ती ही 60 मिलियन डॉलर म्हणजे 500 कोटी रुपये इतकी आहे.