मोहम्मद शमी लवकरच इंडियन टीममध्ये परतणार? जाणा सर्जरी नंतरचे अपडेट्स

टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी याच्याबद्दल BCCI ने हेल्थ अपडेट्स दिले आहे

BCCI ने दिलेल्या माहितीवरून 26 फेब्रूवारी 2024 ला मोहम्मद शमीच्या उजव्या टाचेची यशस्वीरित्या सर्जरी केली गेली.

शमी आता रिकव्हरी फेजमध्ये असून तो लवकरच नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (NCA) येथे त्याची रिहॅब प्रोसेस सुरू करणार आहे.

आताच मोहम्मद शमीच्या उजव्या टाचेची यशस्वीरित्या सर्जरी झालीये. सोशल मिडियावर पोस्टकरून शमी बोलला आहे की, त्याला रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागेल.

शमीवर झालेल्या सर्जरीमूळे आयपीएल 2024 मधून तो बाहेर झालेला आहे. यामुळे गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसलेला आहे.

आपल्या दुखापतीमूळे शमी हा सध्या इंग्लंडविरूद्ध चालू असलेली सिरीजपण खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये मोहम्मद शमी हा शेवटचा मैदानावर खेळला होता.

काही नवीन रिर्पोटनुसार सांगितले जात आहे की, मोहम्मद शमी याची बांग्लादेश आणि न्यूझीलँड यांच्या बरोबर भारतात होणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

अशातच शमी सरळ ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या सिरीजमध्येच खेळताना दिसू शकतो. पण शमी टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळणार की नाही? यावर अजून प्रश्नचिन्ह बनलेले आहे.

मोहम्मद शमीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामूळे त्याला अर्जुन पूरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीने आपल्या करियरमध्ये 229 टेस्ट, 195 वनडे आणि 24 टी-20 विकेट्स पटकावल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story