IND vs PAK सामन्यापूर्वी म्हणतो...
आशिया चषक स्पर्धेला आता फक्त काही तास शिल्लक आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल.
टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळेल. या सामन्यापूर्वी आता कॅप्टन रोहितने मोठं वक्तव्य केलंय.
गेल्या 16 वर्षांत मी एक व्यक्ती म्हणून बदललो नाही. यात काही बदल करण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
मी कोणता वारसा मागे सोडणार याचा विचार करणारी व्यक्ती मी नाही. माझा वारसा लोकांना मूल्यमापन आणि चर्चा करण्यासाठी असेल, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं आहे.
त्याच्या या वक्तव्यावरून चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. रोहित शर्मा निवृत्ती घेणार का? असा सवाल आता विचारला जातोय.
सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या बाह्य घटकांची काळजी करू नये, असं मला वाटतं. त्यासाठी स्वतःला आरामदायक ठेवणं गरजेचं आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे.
दरम्यान, आगामी आशिया कपमध्ये रोहित शर्मा 2019 च्या फॉर्ममध्ये परतणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. रोहित शर्मासाठी कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.