भारत आणि पाकिस्तानमध्ये आज सामना

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय-व्होल्टेज सामना पार पडणार आहे. वर्ल्डकपमधील हा 12 वा आणि दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला सामना आहे.

संगीत सोहळ्याचं आयोजन

गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे. यादरम्यान संगीत सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.

भारत तिसऱ्या क्रमांकावर

याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाशी भिडला आहे. स्कोअर बोर्डावर भारत तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.

सामना लाईव्ह पाहण्याची संधी

दोन्ही संघांकडे सध्या प्रत्येकी 4-4 गुण आहेत. हा सामना टीव्हीसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही लाईव्ह पाहता येणार आहे. Disney+Hotstar वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे.

कधी होणार सामना?

यासाठी तुमच्याकडे Disney+Hotstar चं सबस्क्रिप्शन असण्याची गरज आहे. दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे.

सर्वांना मोफत पाहता येणार नाही

Disney+Hotstar वर्ल्डकप 2023 च्या सामन्यांचं मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग करत आहे. पण हे फ्री स्ट्रिमिंग सर्वांसाठी मोफत नाही.

SD क्वालिटीत पाहू शकता

ओटीटी प्लॅटफॉर्म फक्त मोबाइल युजर्सनाच फ्री लाईव्ह स्ट्रिमिंगचा आनंद लुटण्याची संधी देत आहे. यावर तुम्ही SD क्वालिटीत सामना लाईव्ह पाहू शकता.

सबस्क्रिप्शनची गरज

तुम्ही टॅब्लेट किंवा मोबाईलवर Disney+Hotstar मोबाईल अॅपच्या मदतीने सामना मोफत लाईव्ह पाहू शकता. पण जर तुम्हाला टीव्हीवर पाहायचं असेल तर सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.

या गोष्टी ध्यानात ठेवा

कंपनी सुपर प्रिमियम प्लान ऑफर करत आहे. सुपर सबस्क्रिप्शनमध्ये युजर्स एकाच वेळी दोन स्क्रीनवर एक अकाऊंट वापरु शकतात. तर प्रिमियममध्ये चार स्क्रीनचा पर्याय मिळतो.

VIEW ALL

Read Next Story