जगभरामधील वेगवगेळ्या देशांच्या संघामध्ये अनेक हिंदू खेळाडू असून ते अनेकदा आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात. अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात...
पाकिस्तानचा माजी लेग स्पीनर दानिश कनेरिया हा हिंदू आहे. तो अनेकदा धार्मिक संदर्भातून फोटो शेअर करतो. पत्नीबरोबर गरब्याच्या वेळेस शेअर केलेला हा असाच एक फोटो.
बांगलादेशचा हा खेळाडू दरवर्षी त्याच्या घरी नवरात्रीदरम्यान दुर्गा पुजेचं आयोजन करतो.
वेस्ट इंडिजचा हा माजी क्रिकेटपटू हिंदू आहे. तो अनेकदा मंदिरांमध्ये दिसून आला आहे.
बांगलादेशचा हा क्रिकेटपटू हिंदू असून तो दरवर्षी दुर्गा पूजेमध्ये आवर्जून सहभागी होतो. त्याने त्याच्या कुटुंबासोबत दुर्गा पूजेच्या मंडपातून शेअर केलेला हा फोटो.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज हा हिंदू आहे. भारतात आल्यानंतर तो अनेकदा वेगवेगळ्या मंदिरांना आवर्जून भेट देतो.
इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू समित पटेलने भारतीय परंपरेनुसार लग्न केलं होतं.
श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरण हा श्रीलंकन तमीळ आहे. त्याने भारतीय तमीळ तरुणी माधीमलार राममुर्तीबरोबर लग्न केलं आहे.
बांगलादेशचा हा माजी क्रिकेटपटू अनेकदा दुर्गा पूजेदरम्यान मंडपामध्ये देवीच्या दर्शनासाठी हजर असतो.
आर्यन दत्त हा भारतीय वंशाचा डच खेळाडू भारतापासून दूर राहत असला तरी दरवर्षी दिवाळी अगदी उत्साहाने साजरी करतो.