मारुतीच्या गाड्यांवर दणदणीत सूट, कंपनीने जाहीर केला 2.21 लाखांपर्यंत डिस्काऊंट; पाहा गाड्यांची यादी

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने वर्षाखेरीस गाड्यांवर मोठा डिस्काऊंट जाहीर केला आहे.

मारुती सुझुकीने NEXA डिलरशीपच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या गाड्यांवर अनेक डिस्काऊंट जाहीर केले आहेत. ज्यातून तुम्ही 2.21 लाखांपर्यंत बचत करु शकता.

Maruti Ignis

मारुती इग्निस आपल्या एसयुव्ही लूक आणि डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. हिची किंमत 5.84 लाख आहे. या हॅचबॅक कारवर कंपनी 65 हजारांचा डिस्काऊंट देत आहे.

Maruti Baleno

मारुती बलेनो सर्वाधिक मागणी असणाऱ्या कारपैकी आहे. हिची सुरुवातीची किंमत 6.61 लाख आहे. कंपनी या कारवर डिसेंबर महिन्यात 47 हजारांची सूट देत आहे.

Maruti Ciaz

9.30 लाखांपासून विक्री सुरु होत असलेल्या सेडान कारवर कंपनीने 58 हजारांची डिस्काऊंट ऑफर दिली आहे.

Maruti Fronx

Maruti Fronx ला कंपनीने नुकतंच लाँच केलं आहे. हिची किंमत 7.46 लाखांपासून सुरु होते. डिसेंबर महिन्यात या कारच्या खरेदीवर 30 हजारांचा डिस्काऊंट दिला जात आहे.

Grand Vitara

10.70 लाखांपासून किंमत सुरु होत असलेल्या या एसयुव्हीवर 35 हजारांचा डिस्काऊंट आहे.

Maruti Jimmy

Maruti Jimmy चं थंडर एडिशन लाँच करण्यात आलं आहे. हिची किंमत 10.74 लाखांपासून सुरु होते. ही किंमत आधी 12.74 लाखांपासून सुरु होत होती. या कारमध्ये ग्राहक 2.21 लाखांची बचत करु शकतात.

VIEW ALL

Read Next Story