5.54 लाख किंमत, 34KM चा मायलेज; धडाक्यात विकली जात आहे 'ही' फॅमिली कार

भारतीय बाजारपेठेत कमी किंमत, कमी मेंटेनन्स आणि चांगला मायलेज देणाऱ्या गाड्यांची मोठी मागणी आहे.

ठरली बेस्ट सेलिंग कार

मारुती सुझूकीची टॉल ब्वॉय म्हणून ओळखली जाणारी Wagon R देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात कारच्या 22,080 युनिट्सची विक्री केली आहे.

विक्रीत 23 टक्क्यांची वाढ

Wagon R च्या विक्रीत 23 टक्क्यांची वाढ दिसली आहे. या कारमध्ये असं काय आहे ज्यामुळे ती लोकप्रिय आहे हे जाणून घ्या.

1999 मध्ये फर्स्ट जनरेशन लाँच

मारुती सुझुकीने 18 डिसेंबर 1999 रोजी Wagon R च्या फर्स्ट जनरेशन मॉडेलला घऱगुती बाजारपेठेत लाँच केलं होतं. याचं थर्ड जनरेशन मॉडेल सध्या विकलं जात आहे. जे आपल्या सेगमेंटमध्ये फार प्रसिद्ध आहे.

दोन पेट्रोल इंजिन

Wagon R दोन पेट्रोल इंजिनसह येते. एका व्हेरिटंयमध्ये 1.0 लीटर आणि दुसऱ्यात 1.2 लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

सीएनजी व्हेरियंटही उपलब्ध

हे इंजिन 5 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह येतं. ही कार सीएनजी व्हेरिटंयमध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचं पेट्रोल व्हेरियंट 23.56 किमी आणि सीएनजी व्हेरियंट 34.05 किमी मायलेज देते.

फिचर्स

कारमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 4 स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टिअरिंग माऊंटेड ऑडिओ, फोन कंट्रोल मिळतो. या कारचा हेडरुफ आपल्या सेगमेंटमध्ये फार प्रसिद्ध आहे.

सेफ्टी फिचर्स

यामध्ये ड्युअल एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, रेअर पार्किंग सेन्सर, हिल होल्ड असिस्ट सारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

Wagon R दोन ड्युअल टोन आणि 6 मोनोटोन कलरमध्ये येते.

VIEW ALL

Read Next Story