'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?

नेहा चौधरी
Dec 13,2024


नवीन वर्षात प्रयागराज इथे जगातील सर्वात मोठा महाकुंभ मेळा भरणार आहे.


महाकुंभ मेळाव्याला 13 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत असणार आहे.


या महाकुंभ मेळाव्यात महिला नागा साधूही सहभागी होतात.


या महिला नागा साधूंना नागिन या शब्दाने संबोधलं जाणार आहे.


या महिला नागा साधू शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. त्यांना टक्कर देणे फार कठीण मानले जाते.


श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात विदेशी महिला नागा साधूंची संख्या जास्त आहे. या आखाड्यात पाच हजारांहून अधिक महिला नागा साधू आहेत.


आखाड्यातील महिला साधूंना माई, अवधूतानी किंवा नागिन असं म्हटलं जातं.


जुना आखाड्याव्यतिरिक्त महिला नागा साधू देखील कुंभ काळात दशनम सन्यासीनी आखाड्यात येतात.


कुंभमेळ्यात महिला तपस्वींसाठी माई बडा नावाचे स्वतंत्र शिबिर केले जाते.


कुंभच्या वेळी खूप थंडी असते. या महिला नागा साधू फक्त पातळ सुती कपड्यात असतात. योगाभ्यासाच्या माध्यमातून त्या थंडीवर विजय मिळवतात.


या 'माई' किंवा 'नागिन' आखाड्याच्या कोणत्याही प्रमुख पदावर निवडून येत नाहीत. पण विशिष्ट क्षेत्राचा प्रमुख म्हणून त्यांना 'श्रीमहंत' ही पदवी दिली जाते.


पुरुष नागा साधूंना नागा म्हणतात. ते अंगावर कोणतेही कपडे घालत नाहीत. फक्त राख लावतात.


महिला नागा साधूंना स्त्रीलिंगात नागिन म्हणतात. त्याचा अर्थ अजिबात नकारात्मक नाही किंवा सर्प प्रजातीचा नाग असा अर्थ नाही.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story