Garena Free Fire गेमची भारतात पुन्हा एन्ट्री होतेय. या गेमला भारतात दीड वर्षांपूर्वी बंदी आणण्यात आली होती. आता बंदी हटवण्यात आली आहे.

बंदी येण्यापूर्वी हा बॅटल रॉयल गेम भारतात प्रचंड प्रसिद्ध झाला होता. PUBG वर बंदी आणल्यानंतर सर्वात जास्त फायदा फ्री फायर गेमला झाला होता.

पण 15 फेब्रुवारी 2022 साली भारत सरकारने 53 अॅप्सवर बंदी आणली होती. यात फ्री फायर गेमसचाही समावेश होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आाला होता.

पण आता तब्बल दीड वर्षांनंतर फ्री फायर गेम्सवरची बंदी हटवण्यात आली आहे. गरेनाची पॅरेंट कंपनी सी ने भारतात परतण्यासाठी Yotta शी भागिदारी केली आहे. योट्टा हे एक लोकल क्लाऊड आणि स्टोरेज प्रोवाईडर आहे.

भारतात 5 सप्टेंबरला फ्री फायर गेम्सची एन्ट्री होणार आहे. म्हणजे पाच सप्टेंबरपासून हा गेम तूम्ही प्ले स्टोरमधून डाऊनलोड करु शकणार आहात. गेमचं हायर व्हर्जन Free Fire Max वर बंदी आणण्यात आली नव्हती.

विशेष म्हणजे फ्री फायर गेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोणीची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेमवर बंदी येण्याआधी भारतात फ्री फायरचे जवळपास 4 कोटी सक्रीय युजर्स होते. जवळपास पबजीसारखाच हा गेम आहे.

फ्री फायर गेमवर बंदी आणल्याने कंपनीला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला होता. बंदीमुळे Sea कंपनीचा मार्केट कॅप 16 अरब डॉलरने कमी झाला होता.

VIEW ALL

Read Next Story