रोज 12 तास मिळणार फ्री इंटरनेट; 'या' कंपनीने लाँच केला सुपर हिरो प्लॅन

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

12 तास फ्री डेटा मिळणार

व्होडफोन आयडियाने नवा सुपर हिरो प्लॅन लाँच केला आहे. हा एक युनिक प्लॅन आहे, जो युजर्सला 12 तासांसाठी फ्री डेटा ऑफर करतो.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

आधीही दिली आहे अशी ऑफर

VI ने अशी ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने याआधीही अनेक प्लॅन्समध्ये फ्री अनलिमिटेड डेटाची ऑफर दिली आहे. या प्लॅनमध्ये रात्री 12 पासून ते सकाळी 6 पर्यंत फ्री डेटा मिळतो.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

लाँच केला सुपर हिरो प्लॅन

सुपर हिरो प्लॅनमध्ये युजर्सला 12 तासांसाठी फ्री डेटा मिळतो. युजर्सला रात्री 12 वाजल्यांपासून दुपारी 12 वाजेपर्यंत फ्री डेटा मिळेल.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

अतिरिक्त फायदे

कंपनीचं म्हणणं आहे, उर्वरित अर्ध्या दिवसात युजर्सना अतिरिक्त डेटा बेनिफिट्स मिळतील. ज्यामुळे ते कनेक्टेड राहतील.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

विकेंड डेटा रोलओव्हर

या प्लॅनमध्ये फक्त इतकंच नाही तर इतर सुविधाही आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळेल.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

वाचलेला डेटा वापरता येणार

म्हणजे वाचलेला डेटा तुम्ही आठवड्यात वापरु शकता. तसंच कंपनी डेटा डिलाइट ऑफरही देत आहे.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

डेटा डिलाइट बेनिफिट मिळणार

यामध्ये युजर्स एका महिन्यात दोन वेळा 2GB एक्स्ट्रा डेटा विना कोणत्याही अतिरिक्त चार्ज अनलॉक करु शकणार आहेत. हा डेटा Vi App किंवा 121249 वर डायल करुन अॅक्टिव्ह केला जाईल.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

वेगळा प्लॅन खऱेदी करण्याची गरज नाही

सुपर हिरो प्लॅन वेगळा खरेदी करण्याची गरज नाही. कंपनी डेली 2GB डेटा प्लॅनसह ही सुविधा मोफत देत आहे. या प्लॅनची सुरुवात 365 रुपयांपासून होत आहे.

Published by: Shivraj Yadav | Dec 06, 2024

VIEW ALL

Read Next Story