वाढत्या थंडीसह हळू हळू अल्कोहोलचे (Alcohol) सेवन करण्याचे प्रमाणही वाढताना दिसते.
हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी अनेकजण मद्यपान करतात.
हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरात उबदारपणा येतो असे अनेकांना वाटते.
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार संतुलित तापमानात मद्यपान केलं तर शरीराच्या मूळ तापमानावर कोणताही परिणाम होत नाही.
थंडीत जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात.
अल्कहोल हे व्हॅसोडीलायटर या औषधाच्या समकक्ष मानलं जातं.
मद्यपान केल्याने रक्तवाहिन्या ताणल्या जातात. या वाहिन्यांमधून जादाप्रमाणात रक्तवहन होऊन ते त्वचेत अधिक प्रमाणात गेल्याने उबदारपणा जाणवतो.