100 रुपयांची नोट लिलावात 56 लाखांना विकली; असं काय आहे यात खास?

Pravin Dabholkar
Jan 06,2025


2017 साली लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात भारतीय चलनाची 100 रुपयांची नोट 56 लाख 49 हजार 650 रुपयांना विकली गेली.


ही नोट आरबीआयने 1950 च्या दशकात जारी केली होती. याचा सिरियल क्रमांक HA 078400 असा होता.


ही नोट सर्वसाधारण नोट नव्हती. ही नोट कधीकाळी आखाती देशांमध्ये चालायची.


आरबीआयने हाज यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी या नोटेचा उपयोग केला. हीला हज नोट म्हणून ओळखले जाऊ लागले.


मुंबईतून ही नोट जारी केली जायची याचा सिरियल नंबर एचएने जोडले जायचे. तीच याची ओळख बनली.


हज यात्रेला जाणाऱ्या काही भारतीयांकडून अवैध पद्धतीने सोन खरेदीसाठी जुन्या नोटांचा उपयोग केला जायचा.


यासाठी बॅंकेने यात्रेकरुंसाठी 100 आणि 10 रुपयांची नोट जारी केली होती. याचा रंग भारतीय नोटेपेक्षा वेगळा होता. या भारतात लीगल नव्हत्या.


संयुक्त अरब, अमीरात, कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानसारख्या आखाती देशात भारतीय रुपये अधिकृत चलन मानले जायचे.


1961 मध्ये कुवैतने आपली करन्सी सुरु केली. यानंतर इतर आखाती देशांनी आपापली करन्सी सुरु केली. हज नोटांचे चलन 1970 च्या दशकात बंद करण्यात आले.


हज नोट आता चलनात नाही. त्यामुळे ती अत्यंत दुर्मिळ आहे. यानेच या नोटेची किंमती वाढली आहे.

VIEW ALL

Read Next Story