अजरामर आहेत महाभारतातील 'ही' पात्रं; काही नावं ऐकलीच नसतील

महर्षी वेदव्यास

असे मानले जाते की महर्षी वेदव्यास महाभारत युद्धानंतर हिमालय पर्वताच्या दिशेने गेले होते आणि कलियगानंतर कल्की काळापर्यंत असे वरदान त्यांना मिळाले होते. त्याचबरोबर गणेशजींनी महर्षी वेदवांच्या सांगण्यावरूनच महाभारत लिहिले होते.

महर्षी दुर्वासा

महाभारतात महर्षी दुर्वासाचे वर्णन क्रोधित ऋषी म्हणून केले आहे.दुर्वासाने श्रीकृष्णाचा मुसगा सांब यालादेखील श्राप दिला होता .महर्षी दुर्वासा यांना देखील महाभारतानंतर अजरामर राहण्याचे वरदान मिळाले आहे.

जामवंत

जामवंत हे रामायण काळात श्रीरामांसोबत होते.महाभारताच्या वेळी त्यांची कन्या जामवंती हिचा विवाह श्रीकृष्णाशी झाला, त्यानंतर सांबाचा जन्म झाला. महाभारतानंतर जामवंत यांना देखील दीर्घायुष्य लाभले होते.

अश्वत्थामा

श्रीकृष्णाने अश्वत्थामाला 3 हजार वर्ष शरीरासह भटकण्याचा श्राप दिला होता. पण तो अद्याप जिवंत आहे की नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.

कृपाचार्य

कृपाचार्य हे अश्वत्थामाचे मामा होते.यासोबतच ते कौरवांचे कुलगुरू म्हणून देखील ओळखले जातात. या चिरंजीवी पात्रांमध्ये कृपाचार्यांचा देखील समावेश आहे.

ऋषी मार्कंडेय

मार्कंडेय ऋषी हे भगवान शिवाचे महान भक्त होते. मार्कंडेय ऋषींना भगवान शिवाने अमरत्वाचे वरदान दिले होते.

VIEW ALL

Read Next Story