जगातील 20 देशात एकही नदी नाही; 8 तर आशियातच! थक्क करणारी यादी एकदा पाहाच

भारतात दरवर्षी पूर समस्या

भारतात दरवर्षी पावसळ्यात अनेक नद्यांना येणारे पूर हा गंभीर विषय आहे.

20 देशांमध्ये एकही नदी नाही

मात्र तुम्हाला माहितीये का जगात 20 असे देश आहेत ज्यामध्ये एकही नदी वाहत नाही.

यापैकी 8 देश आशियामध्ये

विशेष म्हणजे यापैकी 8 देश एकट्या आशियामध्ये आहेत. हे देश कोणते ते पाहूयात..

एकही नदी नसलेला देश

बहरीनमधून एकही नदी वाहत नाही.

हा देश सीमेवरील नदीचं वापरतो पाणी

कुवेत या देशाला इराकच्या सीमाभागाला लागून असलेल्या नदीचं पाणी दिलं जातं.

या बेटासारख्या देशावर एकही नदी नाही

मालदीव या बेटवजा देशामध्येही एकही नदी नाही.

या देशात एकही नदी नाही

ओमानमध्येही एकही नैसर्गिक नदी नाही.

या देशात केला जातो वालदी पद्धतीचा वापर

कतारमध्ये एकही नदी नसली तरी 306 वालदी आहेत. वालदी म्हणजे ओढ्याप्रमाणे प्रवाह ज्यांना पावसाळ्यात पाणी असतं.

सौदी अरेबियामध्येही एकही नदी नाही

सौदी अरेबिया देशासुद्धा एकही नदी नाही. सौदीमध्येही वालदी पद्धत वापरली जाते.

या श्रीमंत देशात एकही नदी नाही

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्येही एकही नैसर्गिक नदी नाही. त्यांनी शहराच्या सौंदर्यासाठी वेगवेगळे कालवे तयार केले. युएई समुद्राचं पाणी उकळून पिण्याचं पाणी मिळवणारा देश आहे.

या देशातही एकही नदी नाही

यामेन या आखाती देशातही एकही नदी नाही.

इतर देशांवर अवलंबून

हे सर्व देश पिण्याच्या पाण्यासाठी शेजारच्या देशांवर किंवा इतर जलस्त्रोतांवर अवलंबून आहेत.

VIEW ALL

Read Next Story