प्रत्येक देशाचा एक राष्ट्रीय प्राणी तसेच पक्षीही असतो.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.
त्याचप्रमाणे कोंबडा सुद्धा एक नाही तर दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा देश कोणता तुम्हाला ठाऊक आहे का?
खरं तर या देशाचं आणि भारताचं हजारो वर्षांपासूनचं खास नातं आहे. तुम्ही ओळखलं का नाव?
तर कोंबडा हा राष्ट्रीय पक्षी असलेला देश आहे, आपल्या शेजारचा श्रीलंका!
श्रीलंकन वाइल्ड फाऊल म्हणजेच श्रीलंकेतील जंगली कोंबडा हा या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.
पूर्वी याला सीलोन वाइल्ड फाऊल असं म्हणायचे. हा पक्षी केवळ श्रीलंकेतील जंगली भागात आढळून येतो.
खरं तर ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. ही कोंबड्याची प्रजाती शाकाहारी आणि मांसाहारीही असतात.
विशेष म्हणजे केवळ श्रीलंकाच नाही तर फ्रान्सचा राष्ट्रीय पक्षीही कोंबडाच आहे.
फक्त फ्रान्समधील गॅलिक रुस्टर प्रजातीचा जंगली कोंबड्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.