वयाच्या 53 व्या वर्षी एलॉन मस्क 12 व्यांदा बनला बाप; रोज खातो तरी काय?

सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, एलॉन मस्कचा वाढदिवस 28 जून रोजी असतो. हा मस्क यंदाच्या वर्षी 53 वर्षांचा झाला आहे

12 व्यांदा बाप

काही दिवसांपूर्वीच मस्क 12 व्यांदा बाप झाला. अनेक महिलांसोबतच्या नात्यामुळं मस्कचं खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरलं. अफेअर, लग्न आणि घटस्फोट यांचं वलय त्याच्याभोवती कायमच दिसलं.

4 वेळा घटस्फोट

आतापर्यंत 4 वेळा घटस्फोट घेतलेला मस्क फिटनेसच्या बाबतीत बराच सजग असल्याचं पाहायला मिळतं. त्याची शरीरयष्टी पाहता तो 53 वर्षांचा असेल यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही.

1 कॅनेडियन डॉलर

मस्कनं स्वत:च त्याच्या काही सवयींचा खुलासा 2020 मधील एका पॉडकास्टमध्ये केला होता. महाविद्यालयीन दिवसांमध्ये मस्क जेवणावर फक्त 1 कॅनेडियन डॉलर खर्च करत होता. यामध्ये तो हॉट डॉग, संत्र किंवा पास्त खात असे.

कॉफी आणि डाएट कोक

दर दिवशी डोनट खाणाऱ्या मस्कला सुशी, चॉकलेट, कॉफी आणि डाएट कोक पिण्याची आवड आहे. मांसाहार आणि बटाट्याचा समावेश तो आहारात करतो. फ्रेंच पद्धतीचं जेवण आणि बार्बेक्यू त्याच्या विशेष आवडीचे.

वजन आणि रोगप्रतिकारक शक्ती

वजन आणि रोगप्रतिकारक शक्तीनुसार आहारावर तो कायम भर देतो. ऑफिस मिटींगदरम्यान तर, समोर आलेला पदार्थाचा तो 5 मिनिटांत फडशा पाडतो. व्यायामाची आवड नसली तरीही शारीरिक सुदृढतेसाठी मस्क व्यायाम करतो.

सवयी...

झोपण्याच्या किमान तीन ते चार तासांपूर्वी मस्क मद्य किंवा कोणतंही खाद्य टाळण्याला प्राधान्य देतो. (वरील माहिती मुलाखतींमधील संदर्भांवर आधारित असून, झी 24तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story