'या' नोकऱ्यांमध्ये मिळणार 5 लाखांहून अधिक पगार
सुखी आयुष्यासाठी जे निकष गरजेचे असतात त्यात 21 व्या शतकामध्ये मनाजोग्या नोकरीचीही जोड मिळाली आहे.
मनाजोग्या नोकरीचं समीकरण आणखी एका मुद्द्याशी जोडलं गेलं आहे ते म्हणजे नोकरीच्या ठिकाणी मिळणारा पगार.
तुम्हाला माहितीये का, काही नोकऱ्या अशाही आहेत जिथं तुम्हाला पगाराच्या स्वरुपात लाखोंची रक्कम मिळते.
यामध्ये सरासरी 5 ते 6 लाखांचा प्रारंभी पगार देणारी नोकरी म्हणजे बिझनेस अॅनालिस्ट. वैद्यकिय क्षेत्रातील नोकरीमध्येही साधारण 5 लाख रुपयांपर्यंतचा पगार दिला जातो.
मार्केटिंग क्षेत्रातील बऱ्याच नोकऱ्यांमध्येही लाखोंच्या घरात म्हणजेच साधारण 5 लाख किंवा पदानुसार त्याहून जास्त पगार दिला जातो.
इन्वेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात पगाराचा आकडा मोठा असतो. वेळप्रसंगी तो 6 लाखांहून अधिक असतो. तर, मॅनेजमेंट क्षेत्रात पगाराचा आकडा 3 लाखांच्या घरात असतो.