अंडी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असतात. प्रत्येक प्रदेशानुसार अंड्यांची किंमत वेगवेगळी असू शकते.
अंड्यात असलेल्या प्रोटीनमुळं देशभरातच नव्हे तर जगभरातही अंडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. मात्र, देशानुसार अंड्यांच्या किंमतीत मोठी तफावत आहे
वर्ल्ड ऑफ स्टेटिस्टिकने विविध देशातील अंड्यांच्या क्रेटच्या (एक डझन) किंमतची लिस्ट शेअर करण्यात आली आहे.
या लिस्टनुसार, स्विट्जरलँडमध्ये अंडी खरेदी करणे सगळ्यात जास्त किंमत चुकवावी लागते.
इथे एका अंड्याच्या क्रेटची किंमत 6.69 डॉलर (557 रुपये) आहे. म्हणजेच एका अंड्याची किंमत 46 रुपये इतकी आहे.
न्युझीलँडमध्ये 5.43 डॉलर, US मध्ये 4.31 डॉलर, डेनमार्कमध्ये 4.27 डॉलर आणि उरुग्वेमध्ये 4.07 डॉलर इतकी आहे.
जगात सर्वात स्वस्त अंडी भारतातच मिळतात. इथे एका अंड्याच्या क्रेटसाठी 0.94 डॉलर म्हणजेच 78.25 रुपये मोजावे लागतात.