पृथ्वीचा एक तृतीयांश भाग पाण्याने भरलाय, हे आपल्या सर्वांना माहिती असेल.
पण पृथ्वीच्या आत किती पाणी आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
पृथ्वीच्या पृष्ठभागावर जितकं पाणी आहे, त्याच्या साधारण एक चतुर्थांश पाणी पृथ्वीच्या खाली आहे.
रिपोर्टनुसार, पृथ्वीच्या आत 43.9 मिलियन क्यूबिक किलोमीटर पाणी आहे.
पृथ्वीच्या आतील बहुतांश पाणी पिण्यायोग्य आहे. तर काही ठिकाणी खारे पाणीदेखील आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर 1.386 बिलियन किलोमीटरवर पाणी आहे.
ज्यातील बहुतांश पाण्याचा भाग पिण्यायोग्य नाही.
समुद्रातील पाणी खारे आहे. जे पिण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.
पृथ्वीवर 2.5 टक्के पाणी गोडं आहे. म्हणजेच पिण्यायोग्य आहे.