जगभरामध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ही महिला आहे तरी कोण?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या मंत्रीमंडळातील एका महिला मंत्र्याची चर्चा तिच्या वक्तव्यांबरोबरच तिच्या सौंदर्यामुळेही असते.
पाकिस्तानच्या या महिला मंत्र्यांचं नाव आहे हिना रब्बानी.
हिना या पाकिस्तानी मंत्रीमंडळातील सर्वात सुंदर महिला म्हणून जगभरात ओळखल्या जातात.
हिना रब्बानी खार या 19 एप्रिल 2022 पासून परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रीमंडळात कार्यरत आहेत.
हिना यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1977 साली पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात झाला.
हिना यांचे वडील जमीनदार आणि राजकीय तज्ज्ञ असलेल्या गुलाम नूर रब्बानी यांच्या कन्या असून याचाही त्यांना चांगलाच फायदा झाला.
राजकारण घरातच असल्याने हिना राजकारणात लवकर स्थीरावल्या. गुलाम नूर रब्बानी म्हणजेच हिना यांचे वडील हे खासदारही होते.
तसेच पाकिस्तानमधील पंजाबचे माजी राज्यपाल आणि मुख्यमंत्री गुलाम मुस्तफा खार हे हिना यांचे मामा आहेत.
हिना यांनी लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्समधून अर्थशास्त्र विषयामध्ये बीएससीची पदवी घेतली आहे.
यानंतर हिना यांनी एमएससी करण्यासाठी अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांनी मायदेशी परतून सक्रीय राजकारणामध्ये सहभाग घेतला.
हिना यांना जुलै 2011 मध्ये पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
वयाच्या 33 व्या वर्षी मंत्री झालेल्या हिना या पाकिस्तानमधील सर्वात कमी वयाच्या मंत्री ठरल्या होत्या.
तसेच हिना रब्बानी या पाकिस्तानच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री ठरल्या.
हिना या परराष्ट्र धोरणासंदर्भातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांनी या विषयावर अनेक भाषणंही दिली आहेत.