फरार ललित मोदीची सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नात हजेरी; विजय मल्ल्याही तिथंच...

Published by: Zee Team | Jun 25, 2024

फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धर्थ मल्ला नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाच्या फोटोंमध्ये जिथं एकिकडे विजय मल्ल्या दिलसा, तिथंच आणखी एक चेहरासुद्धा या सोहळ्यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधून गेला.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

हा चेहरा म्हणजे आयपीएलमधील कथित घोटाळ्याप्रकरणी फरार असणारा ललित मोदी. त्यानंही ब्रिटनमधील हर्टफोर्डशेयर भागात पार पडलेल्या सिद्धार्थच्या लग्नाचा हजेरी लावली होती.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

भारतीय बँकांची हजारो कोटींची फसवणूक करून पळ काढलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या मुलाचा लग्नसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला, जिथं त्यानं प्रेससीसोबतच्या नात्याला नवी ओळख दिली.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

सिद्धर्थ जॅस्मिनचा लग्न सोहळा प्रथम ख्रिश्चन धर्मानुसार आणि नंतर हिंदू रितीरिवाजानुसार पार पडला. या लग्नसोहळ्यामुळं सर्वाधिक चर्चा मात्र फरार आणि कथित घोटाळेबाजांचीच झाल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

2010च्या IPL नंतर बीसीसीआयने ललित मोदीला निलंबित केलं होतं. IPL च्या गव्हर्निंग कौन्सिलटच्या अध्यक्षपदी असताना 753 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

दरम्यान, सिद्धार्थ मल्ल्याचा लग्नात ललित मोदीव्यातिरिक्त इतरही अनेक पाहुण्यांची हजेरी होती. या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाले.

Published by: Zee Team | Jun 25, 2024

VIEW ALL

Read Next Story