हज यात्रेला पांढरी वस्त्र परिधान करूनच का जातात?

Jun 25,2024

नियम

हज यात्रेला जाण्यासाठी काही नियमांचं पालन केलं जाणं अपेक्षित आहे. यापैकीच एक नियम आहे, न शिवलेले कपडे वापरणं. या नियमाला इहराम म्हणतात.

हज

प्रत्येक हज यात्रेकरूनं या नियमाचं पालन करणं बंधनकारक असतं. हज यात्रेमध्ये पांढऱ्या रंगाचा सर्वाधिक वापर दिसतो, कारण हा रंग शुद्धता आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे.

सौंदर्याचं प्रतीक

बाह्य आणि अंतर्मनाच्या सौंदर्याचं हे प्रतीक आहे. हजदरम्यान, एकाच प्रकारच्या कापडात एकच काम करणं, एकाच पद्धतीनं नमाज पठण करणं, एकत्र अल्लाहकडे क्षमायाचना करणं आणि दुआ करणं अशी कामं केली जातात.

एकजूट

हजरदरम्यानच्या या कृती मुस्लिम बांधवांमधील एकजूट, शिस्त आणि बंधुभावाचं दर्शन घडवतात. यामुळं सद्भाव वाढतो अधीही धारणा आहे.

भेदभाव मिटवण्यासाठी....

गरीब- श्रीमंत, लहान मोठा असा प्रत्येक भेदभाव मिटवण्यासाठी पांढरी वस्त्र परिधान केली जातात.

योग्यता

कुराणामध्ये उल्लेख केल्यानुसार मुस्लिमांची योग्यता धर्मपारायणता असून, जात, रंग आणि श्रीमंतीचं काही मूल्य नाही, त्यामुळंच हज यात्रेदरम्यान पांढऱ्या वस्त्रांना प्राधान्य दिलं जातं.

VIEW ALL

Read Next Story