सुनीता विलियम्स यांना अंतराळात धोका, त्या अंतराळात अडकल्या या अशा कितीही चर्चा व्हायरल झाल्या तरीही महत्त्वाची बाब म्हणजे इथं गोष्ट स्पष्ट होणं गरजेचं.
विलियम्स या अंतराळात फसल्या नसून, त्या सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या अंतराळातील तळावर सुरक्षित आहेत. त्यांच्या परतीचा प्रवास बोईंग स्टारलायनरमधील हेलियम लीक आणि थर्स्टरमधील बिघाडामुळं लांबला.
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 13 जून रोजी पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं. पण, त्यांच्यापुढं अनेक अडचणी आल्या, ज्यामुळं अनेकांच्याच चिंतेत भर पडली.
नासानं मात्र अंतराळातून या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यास कोणतीही घाई नसल्याचं स्पष्ट केलं. सध्यातरी स्पेस स्टेशनवर पुरेसा अन्नसाठा आणि अंतराळवीरांना अंतराळात राहण्यासाठीच्या वस्तूंचा पुरवठा असल्याचं सांगण्यात आलं.
नासाच्या या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठीचा पर्यायी मार्ग म्हणजे एलॉन मस्कच्या स्पेस एक्सचं यान किंवा रशियाचं सोयुज स्पेसक्राफ्ट.
अंतराळातील या वाढलेल्या मुक्कामादरम्यान विलियम्स संशोधन आणि देखभाल कामांवर लक्ष देणार असून, परतीसाठीच्या प्रयत्नांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील.