भारतामध्ये 2024 च्या भारतरत्न पुरस्कारासाठी लालकृष्ण आडवाणी, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरण सिंह, नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भारतात भारतरत्न असतो त्याप्रमाणे पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता माहिती आहे का? काही भारतीयांनादेखील हा पुरस्कार मिळाला आहे.
निशान ए पाकिस्तान असे पाकिस्तानी सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे.
राष्ट्रहितासाठी सर्वाधिक योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
आतापर्यंत 4 भारतीयांना निशान ए पाकिस्तान पुरस्कार देण्यात आलाय.
भारतीय पर्सर निरजा भरोट यांचे नाव आहे. 1987 मध्ये हा सन्मान मिळवणारी त्या पहिली भारतीय होत्या.
1990मध्ये भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना निशान ए पाकिस्तानने सन्मानित करण्यात आले. त्यांना भारतरत्नही देण्यात आलाय.
14 ऑगस्ट 2020 ला भारतीय आणि काश्मीरी फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
5 डिसेंबर 2023 ला दाऊदी बोहरा समुदायाचे नेता मुफद्दल सैफुद्दीन यांना निशान ए पाकिस्तानने गौरवण्यात आले.