दर मिनिटाला 1 कोटी, रजनीकांतने लेकीच्या चित्रपटात घेतले तगडे मानधन!

साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

रजनीकांत लाल सलाम या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने दिग्दर्शीत केला आहे.

लाल सलाम चित्रपटात रजनीकांत यांनी 40 मिनिटांच्या अभिनयासाठी रोल आहे. पण यासाठीही त्यांनी कोटींची रक्कम आकारली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी मुलीच्या चित्रपटात भूमिकेसाठी 30 ते 40 कोटींचे मानधन आकारले आहे.

कथित रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी एका मिनिटासाठी 1 कोटी रुपयांचे मानधन घेतलं आहे.

चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या दरम्यान, ए.आर रहमान यांनीही एक खुलासा केला होता

सुपरस्टार ए.आर रहमान यांनी म्हटलं आहे की, रजनीकांत यांनी फक्त अभिनयच नाही तर संवाददेखील लिहले आहेत.

VIEW ALL

Read Next Story