इथं संपूर्ण देशाला मिळते महिन्याभराची सुट्टी; नागरिक जगताहेत स्वप्नातलं आयुष्य
जगात एक असा देश आहे जिथे चक्क महिन्याभराची सुट्टी दिली जाते. हा देश म्हणजे 'फिनलँड'.
इथे नोकरीवर जाणाऱ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत आणि देशातील प्रत्येक नागरिकाला ही हक्काची सुट्टी मिळते.
फिनिश कायद्यांतर्गत कर्मचाऱ्यांना कमीत कमी 2 आठवडे सलग सुट्टी घ्यावीच लागते.
फिनलँडमधील नागरिक सहसा चार आठवडे उन्हाळ्यात आणि एक आठवडा हिवाळ्यात सुट्टी घेण्याला प्राधान्य देतात.
राहिला प्रश्न प्रशासकीय कामांचा, तर इथं मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वचजण जुलै महिन्यात कमाला 'दांडी' मारतात.
'फिनिश' नागरिक त्यांची ही सुट्टी युरोपच्या दक्षिण प्रांतात किंवा त्यांच्या वेकेशन होम्सला जाऊन एंजॉय करतात.
सुट्ट्यांच्या या दिवसांमध्ये फिनलँडमध्ये लग्नसोहळ्यांची संख्याही मोठीच असते. त्यामुळं एकंदरच देशात धामधुमीचं आणि आनंदाचं वातावरण असतं असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)