यावर त्यांनी दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. मॅक्सिम आणि त्याच्या मित्राला भूक लागली होती. पण त्यांना बाहेर जाऊन काही आणायचा कंटाळा आला होता. म्हणून त्यांनी करीनालाच कापून खाल्लं.
मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर काही तुकडे बाहेर फेकून दिले. तर काही तुकडे मॅक्सिम आणि तिच्या मित्राने शिजवून खाल्ले. हत्येचं कारण पोलिसांनी विचारलं.
मॅक्सिमने करीनाला फोन करुन आपल्या घरी बोलावून घेतलं. त्यानंतर त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून करीनाची हत्या केली. तिची हत्या केल्यानतंर मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले.
यानंतर पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आणि सखोल चौकशी सुरु केली. तेव्हा धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली. करीनाच्या बॉयफ्रेंडचं नवा मॅक्सिम असं आहे. तो आपल्या एका मित्राबरोबर घरी पार्टी करत होता.
पोलिसांनी मुलीच्या सर्व मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. ज्या मैत्रिणीच्या घरी करीना पार्टीसाठी गेली होती, त्या मैत्रिणीने करीना पार्टीसाठी घरी आली होती, पण तिला कोणाचा तरी फोन आल्यानंतर ती मध्येच निघून गेल्याचं सांगितलं.
पण दुसरा दिवसही उलटल्यानंतर मुलगी घरी न आल्याने आई चिंतेत पडली. तीने थेट पोलीस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
20 जानेवारीला 16 वर्षांची करीना बर्दुचियन शाळेतून थेट मित्राच्या घरी गेली. जाताना तीने आपल्या आईला रात्री उशीरा घरी परत येईन असं सांगितलं.