उजव्या हातानं लिहिणारे, की डावखुरे; सर्वाधिक हुशार कोण?

आपण एकतर उजव्या हातानं लिहितो, किंवा डाव्या हातानं लिहीतो. तुम्हाला माहितीये का हा सवयीचा भाग नसून, त्यामागंही काही कारणं आहेत.

तुमच्या आजुबाजूला तुम्ही अशा काही लोकांना पाहिलं असेल जे एकतर डाव्या हातानं लिहितात किंवा मग उजव्याच हातानं लिहितात.

जेनेटिक कारणं

यामागे DNA अर्थात जेनेटिक कारणंही आहेत. अमेरिकेतीलएका संशोधनातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार जर आई- वडील Righty आहेत तर, त्यांची मुलं लेफ्टी असण्याची शक्यता 9 टक्के असते.

शक्यता...

आई righty आणि वडील लेफ्टी किंवा याउलट परिस्थिती असल्यास ही शक्यता 10 नं वाढून 19 टक्के होते. आई- वडील लेफ्टी असल्यास मुल लेफ्टी होण्याची शक्यता 26 टक्के असते.

डावखुऱ्यांची संख्या

जगभरात उजव्या हातानं काम करणाऱ्यांच्या तुलनेत डाव्या हातानं काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे.

एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार एखादी डावखुरी व्यक्ती त्यांच्या मेंदूशी उत्तमरित्या संपर्क साधू शकते.

मेंदूशी असणाऱ्या या उत्तम ताळमेळामुळं या गुणाचा फायदा डावखुऱ्या व्यक्तींना कलात्मक आणि इतर Ptoductive कामांसाठी होतो.

मेंदूचं कार्य

इथं एक शास्त्रीय कारण कायम लक्षात ठेवा की मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूला आणि अवयवांना नियंत्रित करतो, तर उजवा भाग शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करतो.

कमीत कमी उर्जा वापरून जास्तीत जास्त काम करण्याकडे मेंदूचाही कल असतो.

बहुतांश व्यक्तींमध्ये ही कला अवगत असते ज्यामुळं उजव्या हातानं लिहितात. मग, आता तुम्हीच ठरवा सर्वात हुशार कोण... (छाया सौजन्य- फ्रीपिक)

VIEW ALL

Read Next Story