जल जीरा

जली जीरा उन्हाळ्यात घेणे केव्हाही चांगले असते. यात पुदिन्याची पाने टाकल्यास अधिक चव येते. उन्हाळ्याच्या दिवसात एक उत्तम आरोग्यदायी पेय आहे. जलजीरामध्ये त्याच्या घटकांमुळे पाचक क्षमता वाढते. पुदिन्याची पाने आम्ल आणि सूज दूर ठेवण्यास मदत करते. जिरे वजन कमी करण्यास मदत करते. उन्हाळ्यात ही पेय रेसिपी काही मिनिटांत घरी करु शकता.

लिंबूपाणी

लिंबूपाणी पिणे उन्हाळ्यात चांगले असते. लिंबूपाण्याचे अनेक फायदे आहेत. लिंबूपाण्यात पुदिन्याची पाने टाकल्याने त्याचा स्वाद आणखी वाढतो.

कलिंगड ज्यूस

उन्हाळ्यात फळे खल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. कलिंगड ज्यूस केव्हाही चांगला. हा ज्यूस करताना त्यात तुळसीची पाने टाकल्यास चव येते आणि शरीराला थंडावाही मिळतो. कलिंगड खाल्ल्याने तुम्हा हायड्रेटेड आणि उत्साही राहता. उन्हाळ्यातील उष्णता दूर ठेवण्यासाठी घरी ताजा कलिंगडा रस घेणे कधीही चांगले.

मसाला ताक

उन्हाळ्यात ताक पिणे केव्हाही चांगले असते. ताक असा पदार्थ आहे की तो शरीराला तात्काळ थंड ठेवतो. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासह त्याचे अनेक फायदेही आहेत. ताक पाचनक्रिया वाढविण्यास मदत करते. त्यात थोरे जिरे किंवा मसाला टाकून त्याचे प्राशन केले तर चव चांगली लागते.

कैरी पन्हे

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळाला म्हणून कैरीच्या पन्ह्याला प्राधान्य दिले जाते. सध्या आंब्याचा सिझन आहे. त्यामुळे आंबा सहज उपलब्ध होत आहे. कच्चा आंब्याचे बनवलेले पेय उन्हाळ्यात उत्तम असते. हे पेय घेतल्याने शरीराला थंडावा मिळतो. हे पेय बनविताना यात जिरे, पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि चिमूटभर साखर मिसळून कैरीचे पन्हे तयार केले जाते.

उन्हाळ्यात ही 5 सर्वोत्तम पेय शरीराला देतात थंडावा

VIEW ALL

Read Next Story