Loksabha Election 2024 Live Updates : भटकती आत्मा असते तसा वखवखलेला आत्माही असतो - उद्धव ठाकरे

Loksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.  

Loksabha Election 2024 Live Updates : भटकती आत्मा असते तसा वखवखलेला आत्माही असतो - उद्धव ठाकरे

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणणारी भटकती आत्मा, असं म्हणत पुण्याच्या सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींचा हल्लाबोल केला. तर खटाखट, टकाटक म्हणत राहुल गांधींचीसुद्धा खिल्ली उडवली. पंतप्रधानांनी प्रचारसभांदरम्यान केलेल्या या वक्तव्यांनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा आणि नवे सूर पाहायला मिळाले. या सर्व परिस्थितीवर आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकांवर पवार नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

30 Apr 2024, 09:46 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ... हे पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकता आत्मा म्हणून केलेला लेख कुणाच्या संदर्भात आहे हे महाराष्ट्र जाणतो. जिवंत व्यक्तीला भटकता आत्मा म्हणून हिणवणे हे पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा एक नागरिक म्हणून निषेध करतो', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. 

30 Apr 2024, 09:22 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : चंद्रशेखर बावनकुळे यांचे शाब्दिक बाण 

'महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. 
खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय.
तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||||', असं ट्विट बावनकुळे यांनी केलं. 

30 Apr 2024, 09:05 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : पियूष गोयल भरणार उमेदवारी अर्ज

 उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वाढलीय. भाजपचे पियूष गोयल मुंबई उत्तरमधील उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करतील. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज भरणारेत. त्यांच्याविरोधात मविआला उमेदवारच सापडत नाहीय. इकडे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अर्ज भरतील. भाजपनं त्यांच्याविरोधात उज्ज्वल निकमांना मैदानात उतरवलंय. उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्या विरोधात असलेल्या मिहीर कोटेचा यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केलाय. इकडे कल्याण मतदारसंघात महायुतीसमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर रिंगणात आहेत. त्या आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील. यावेळी आदित्य ठाकरेंचा रोड शो होणारेय. कल्याणमध्ये शिंदेंकडून अधिकृतरित्या अजूनही श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झालेली नाही. धुळ्यामध्ये काँग्रेस अंतर्गतच विरोधाचा सामना करावा लागलेल्या शोभा बच्छाव यांचाही आज अर्ज भरण्यात येणारेय. यावेळी बाळासाहेब थोरात उपस्थित असतील. त्यांच्यासमोर भाजपच्या डॉ. सुभाष भामरेंचं आव्हान असणारेय. 

30 Apr 2024, 09:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 

महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आला आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ही सभा उद्या दुपारी 2.30 वाजता शहरातील गरूड चौकात असणार आहे.

30 Apr 2024, 08:32 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आज पुण्यात सभा

महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आज पुण्यात सभा आहे.. पुण्यातील वारजे मध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला पवार आणि उद्धव ठाकरे आजच्या सभेतून काय उत्तर देणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 

30 Apr 2024, 08:28 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अमित शाह आज ३ राज्यांच्या दौऱ्यावर

अमित शाह आज ३ राज्यांच्या दौऱ्यावर. आसाममध्ये पत्रकार परिषद. तर, बंगालच्या बिष्णूपूर आणि गुजरातच्या नरोडा गावात सभांचं आयोजन

 

30 Apr 2024, 08:22 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : बड्या नेत्यामुळं महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण 

पुण्यातील सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींनी हल्लाबोल केलाय. 'भटकती आत्मा' अशा शब्दांत पवारांवर मोदींनी टीका केलीय. बड्या नेत्यामुळं महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरूये. 45 वर्षांआधी एका नेत्याने राजकीय खेळ सुरु केला. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरू असल्याचं मोदी म्हणाले. तर मोदींना मत मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. असा पलटवार जयंत पाटलांनी केलाय. 

 

30 Apr 2024, 08:19 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा झंझावात आजही राज्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा झंझावात आजही राज्यात पाहायला मिळणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात तीन सभा होणार आहेत.  माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये आज मोदींच्या सभा असतील. माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिवमध्ये. तर भाजपच्या सुधाकर शृंगारेंच्या प्रचारासाठी लातूरमध्ये मोदी सभा घेणार आहेत. त्यांच्या या सभांची जय्यत तयारी करण्यात आलीये. 

30 Apr 2024, 08:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही

जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही. कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्यास विरोध करत देशात अनुचित प्रकार घडवण्याचा कट असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.