खुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर

  पेट्रोल आणि डिझेलबाबत दिलासा देणारी बातमी... गेल्या सात दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागोपाठ बदल होत आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ८०.११ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ६६.८१ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या घसरत्या किंमतीचा स्थानिक बाजारात फायदा मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 19, 2018, 06:24 PM IST
 खुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर  title=

नवी दिल्ली :  पेट्रोल आणि डिझेलबाबत दिलासा देणारी बातमी... गेल्या सात दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागोपाठ बदल होत आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ८०.११ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ६६.८१ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या घसरत्या किंमतीचा स्थानिक बाजारात फायदा मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत आहे. 

दररोज दर बदल होत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पेट्रोल स्वस्त झाले आहे. जाणून घ्या काय आहे दर 

किती आहे पेट्रोलचे दर 

दिल्ली- 72.19 रुपये/लीटर
कोलकाता- 74.93 रुपये/लीटर
मुंबई- 80.06 रुपये/लीटर
चेन्नई- 74.86 रुपये/लीटर

एक आठवड्यात किती स्वस्त झाले पेट्रोल 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ११ मार्च बद्दल बोलायचे तर पेट्रोलचा दर ८० रुपये ३५ पैसे होते. आता ही किंमत ८०.११ पैसे झाले आहे. आता साधारण २९ पैशांची घट झाली आहे. 

डिझेलमध्ये ही झाली घट 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ११ मार्च बद्दल बोलायचे तर डिझेलचा दर ६६ रुपये ९७ पैसे होते. आता ही किंमत ६६.८१ पैसे झाले आहे.