अल्जीरियामध्ये विमान दुर्घटनेत जवळपास २०० लोकांचा मृत्यू

अल्जीरियामध्ये मोठी विमान दुर्घटना

shailesh musale Updated: Apr 11, 2018, 04:50 PM IST
अल्जीरियामध्ये विमान दुर्घटनेत जवळपास २०० लोकांचा मृत्यू title=

अल्जियर्स : अल्जीरियामध्ये एका विमान दुर्घटनेत जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. लष्कराचं हे विमान असल्याचं बोललं जातंय. यादुर्घटनेत 200 लोकांनी आपला जीव गमावला आहे. बुधवारी सकाळी 8 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. ब्लिदा शहरातील एअरपोर्टजवळ ही घटना घडली. विमान दुर्घटनेमागचं कारण अजून समोर आलेलं नाही. 4 वर्षापूर्वी देखील एक विमान दुर्घटना झाली होती ज्यामध्ये जवान आणि जवानांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला होता. एकूण 77 लोकं या विमान दुर्घटनेत मारली गेली होती.

14 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे. इल्युशिन इल-76 चं उत्पादन 1970 पासून होत आहे. अजूनही या विमानाचा सुरक्षेच्या बाबतीत चांगला रेकॉर्ड आहे. य़ा विमानाचा उपयोग कमर्शियल आणि मिलिट्री ट्रांसपोर्टसाठी केला जातो. अल्जीरियन मिलिट्रीकडे अशी अनेक विमानं आहेत.